दंगली घडविणाऱ्याना अद्दल घडविणार : उपमुख्यमंत्री फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ मे २०२३ ।  राज्यात गेल्या दोन दिवसापासून दोन शहरात जोरदार राडा पाहायला मिळत आहे. अकोल्यानंतर शेवगावमध्येही सध्या पोलीस तैनात आहे. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. या दोन घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

दोन्ही ठिकाणी पूर्पणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचं प्रयत्न करताहेत, सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार. असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

तसेच, हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करातेहत त्यांना आम्ही सोडणार नाहीत”, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. “काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन. असही फडणवीस यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम