मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला बंद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  दोन दिवसापूर्वी देशात प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष चित्रपटाचा नवा वाद आता सुरु झालेला आहे. मुंबईतील नालासोपारा येथे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संध्याकाळी चित्रपटाचा शो बंद पाडला. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये घोषणाबाजी करत प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यानंतर शो रद्द करण्यात आला.

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये रविवारी संध्याकाळी हिंदूत्ववादी संघटनांनी रॅली काढली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मॉलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंगही केले होते, मात्र ते तोडून कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये प्रवेश केला. नंतर सभागृहासमोर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. पोलिसांनी त्यांना अटक करून तिथून काढले.

चित्रपट निर्मात्यांनी वादग्रस्त संवादाचा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी रविवारी ट्विट करून चित्रपटाबाबत स्पष्टीकरण दिले आणि चित्रपटातील वादग्रस्त संवाद या आठवड्यात बदलले जातील असे सांगितले. नेपाळ सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही चित्रपटातील सीतेच्या जन्मस्थानासंदर्भातील वादग्रस्त विधान हटवण्यात आले. त्यानंतर तेथे चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, उर्वरित संवादांमुळे हा चित्रपट वादात सापडला असून आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम