आदित्यने दिले मुख्यमंत्री शिंदेंना ओपन चॅलेंज !

बातमी शेअर करा...

वरळीतील एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मी राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. वरळीतून उभे राहा. तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणारच. असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. आता एकनाथ शिंदे याला कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना खुले आव्हान दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची आहे ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा. पण एक सुद्धा मत विकले जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही. तुम्ही वरळीतून उभे राहा. तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, हातात ताकद आहे. म्हणून म्हणतोय वरळीत या. तसे प्रत्येक आठवड्यात ते वरळीत येतच असतात. मात्र ते लपून छपून येतात. कुठेतरी नारळ फोडण्याचा प्रयत्न करतात. असा खोचक टोला आदित्य यांनी शिंदेंना लगावला. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘आपला दवाखाना’ ही योजना शिवसेनेने सुरू केलेली आहे. या गद्दारांनी नाही. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचेय या हेतूने काम करणाऱ्यांना आता आपल्याला रोखायचे आहे. असे आवाहन ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांना केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम