आफताबने केला गुन्हा कबूल; चार दिवसाची कोठडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्याला साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. आफताबने कोर्टात पहिल्यांदा न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

तो म्हणाला- रागात हत्या केली. मी सर्व काही पोलिसांना सांगितले आहे. त्याचवेळी आफताबची आज पॉलीग्राफ चाचणी होऊ शकते.
आरोपी आफताब पूनावालाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, आफताबने न्यायालयात न्यायाधीशांसमोर सांगितले की, जे काही आरोप लावले जात आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. पण माझ्याकडून जे काही घडले ते रागाच्या भरात केले गेले. तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे आफताबने न्यायालयाला सांगितले. आरोपीने सांगितले की, घटनेला बरेच दिवस होऊन गेल्याने त्याला अनेक गोष्टी आठवत नाहीत. चौकशीत आरोपीने नवा खुलासा केला आहे. हत्येसाठी वापरलेले ब्लेड आणि करवत गुरुग्राममध्ये फेकण्यात आल्याचे आफताबने सांगितले. त्याने मोबाईल लोकेशनवरून मार्ग तयार केला. पोलीस आता पुन्हा जंगलात शोधमोहीम राबवणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम