आठवड्याभरानंतर सोन्यासह चांदीचे दरात घसरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | प्रत्येक सणाला महिलांची गर्दी जास्त प्रमाणात सराफ बाजारात दिसून येते. कारण सोन्याचे दागिने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र सध्या सोन्या – चांदीच्या किमती स्थिर नसल्यामुळे सोने नक्की कधी खरेदी करावे हा महत्त्वाचा प्रश्न महिला मंडळासमोर उभा राहिला आहे. गेल्या आठवड्यापासून या सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडले आहेत. परंतु आता या किमतींमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुरुवारनंतर आज (शुक्रवारी) देखील सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. गुरुवारी सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली होती ती आज देखील कायम आहे.

दररोज ऑनलाईन वेबसाईट्स सोन्या-चांदीच्या किंमतीची (Gold Price Today) माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला, MCX वेबसाईट आणि गुडरिटर्न्सवरील किंमती सांगणार आहोत. MCX वेबसाईट, शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,300 रुपये असा सुरु आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,350 रूपयांनी व्यवहार करत आहे. तसेच गुडरिटर्न्स नुसार, शुक्रवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,700 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,510 रूपयांनी व्यवहार करत आहे.

त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, (Gold Price Today) आज चांदीच्या किंमतीही स्थिर आहेत. मौल्यवान असणाऱ्या 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे गुरुवारनंतर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदी केल्यावर योग्य भावात परवडू शकते. तसेच, सोन्याची खरेदी केल्यास ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम