अजितदादानंतर कॉंग्रेसने संजय राऊतांना झापले !
दै. बातमीदार । ३ मे २०२३ । राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका सातत्याने मांडणारे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना यांची जाहीर सभा जरी मोठ्या उत्साहात होत असली तरी या पक्षातील नेत्यामधील शीत युद्ध मात्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना फटकारले होते. दुसऱ्या पक्षाची वकिली करू नका, असे म्हणत अजित पवार यांनी संजय राऊत यांना खडसावले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत आणि अजित पवार हे आमने-सामने आले. मी महाविकास आघाडीचा वकील असल्याचे त्यावेळी संजय राऊत यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटले होते. मात्र आता अजित पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील संजय राऊत यांना चांगलेच झापले आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ मोठी खळबळ माजली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे असले तरी निर्णय राहुल गांधींच घेतात असे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या विधानानंतर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल बोलून चोमडेगिरी करू नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राऊतांना चांगलेच झापले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता नाना पटोले यांनी देखील संजय राऊत यांना फटकाऱ्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पटोले यांच्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सरकार मोदींचे हस्तक असल्याने राज्यातले उद्योग, पाणी हे आधी गुजरात आणि आता कर्नाटकला नेले जात आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम