‘हेरा फेरी’ नंतर वेलकम ३ या दिवशी होणार रिलीज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ फेब्रुवारी २०२३ । आजपासून १३ वर्षाआधी ‘हेरा फेरी’ प्रदर्शित झाला होता पण या चित्रपटाची आजही तीच क्रेज कुठेही कमी झालेली दिसत नाही. या चित्रपटामधील अभिनेता अक्षय कुमार , सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यासोबत आणखी एका सुपरहिट कॉमेडी चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे सगळ्यांचा आवडता वेलकम चित्रपटाचा 3 भाग

‘वेलकम’ हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यानंतर 2015 साली वेलकम चित्रपटाचा सिक्वेल आला होता. पहिल्या चित्रपटात अक्षय कुमार दिसला होता. तर दुसऱ्या चित्रपटात अक्षयच्या जागी जॉन अब्राहम दिसला होता. ‘वेलकम’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे नाव आधी ‘वेलकम टू द जंगल’ होते. पण आता या चित्रपटाचे नाव ‘वेलकम 3’ असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असे म्हटले जाते. हा चित्रपट फिरोज नाडियादवाला यांचा असणार आहे.

हेरा फेरी 3 ची शूटिंग शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर किंवा मग हेरा फेरी 3 प्रदर्शित झाल्यानंतर अक्षय लगेच ‘वेलकम 3’चे शूटिंग सुरु करणार आहे. आता सगळ्यांना प्रश्न असेल की वेलकम 3 या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार आहे? मात्र, कोण करणार आहे हे अजून ठरलेलं नाही. दरम्यान, ‘वेलकम 2’ मध्ये अक्षय कुमार नव्हता. आता वेलकम 3 च्या माध्यमातून अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, वेलकम 3 या चित्रपटात अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
अक्षयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की अक्षयचा ‘हेरा फेरी 3’ सोबतच ‘वेलकम 3’ या चित्रपटात दिसणार आहे. पुढच्या वर्षी ‘हेरा फेरी 3’ आणि ‘वेलकम 3’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात. दरम्यान, अक्षयनं नुकताच एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ‘सेल्फी’ हा त्यांचा आगामी चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन हे सगळीकडेच जोरदार सुरू आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयनं रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे. सेल्फीच्या प्रमोशनसाठी अक्षयनं 3 मिनिटात 184 सेल्फी काढत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम