हिंदूनंतर मुस्लीम समुदायाचा आता ‘पठाण’ ला विरोधात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ डिसेंबर २०२२ । अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपट आता चांगलाच वादात सापडला आहे. आधी हिंदू संघटनानी यावर आक्षेप घेतला होता तर आता मुस्लीम समाज हि आता अभिनेता शाहरुख खान यांच्या विरोधात गेला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदूकोणनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला पाहून अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर आता देशभरात सिनेमाला घेऊन मोठा वाद पेटला आहे. प्रकाश राज आणि पायल रोहतगीनंतर आता अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिल्या मात्र आता मुस्लिम संघटनाही या चित्रपटाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

राज्यातील उलेमा बोर्डाने चित्रपटाला विरोध केला असून तो राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं सांगितले आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीनेही ‘पठाण’ला विरोध केला आहे. मध्य प्रदेश हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम धर्माची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही नाही, मग तो शाहरुख असो किंवा अन्य खान.

 

उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनीही ‘पठाण’वर आक्षेप घेत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं सांगितलं. एएनआयशी बोलताना सय्यद अनस अली म्हणाले, ‘या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही हा चित्रपट केवळ मध्य प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही. पठाण हे मुस्लिम समाजातील एक प्रतिष्ठित समुदाय आहेत. या चित्रपटातून केवळ पठाणांचीच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाची बदनामी केली जात आहे. ‘पठाण’ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये महिला अश्लील डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटात पठाणांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम