जान्हवीने ‘हे’ फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी आणलं जमिनीवर…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ गेल्या काही दिवसांपासून जान्हवी सोशल मीडियावर भलतीच अॅक्टिव्ह झाली आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा बोल्डनेसनं चर्चेत असलेल्या जान्हवीला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले आहे. जान्हवीनं नवीन घर घेतलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. जान्हवीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला असून नेटकऱ्यांना मात्र ती गोष्ट आवडलेली नाही.

बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. जान्हवी तर मिलीच्या प्रमोशनसाठी अनेकदा बोल्ड अंदाजात दिसत होती. काही दिवसांपूर्वी जान्हवीच्या वडीलांनी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी तिच्यासोबत एक फोटो शेयर करुन आम्ही दोघे बहिण भाऊ दिसतो की नाही….अशी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन ते दोघेही खूप ट्रोल झाले होते. आता जान्हवी तिच्या नव्या घरावरुन ट्रोल झाली आहे.जान्हवी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. बोल्ड लूकमध्ये तिनं शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून तिला मिळणाऱ्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असतात. जान्हवीनं आता मुंबईत बांद्रयामध्ये ६५ कोटींचे घर घेतले आहे. डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलेल्या जान्हवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र नेटकऱ्यांनी लगेच तिला जमिनीवर आणलं आहे. नेटकऱ्यांनी आता जान्हवीच्या बँक बॅलन्सविषयी बोलण्यास सुरुवात केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम