मणिपूरनंतर हरियाणात वातावरण तापलं !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढ असतांना आता हरियाणातील नूह जिल्ह्यात हिंसाचार सुरु झालेला असून राज्यातील इतर जिल्ह्यातही पसरताना दिसत आहे. सोमवारपासून सुरु झालेला हिंसाचार बुधवारीही सुरु आहे. हरियाणाच्या गुरुग्रामसह इतर काही जिल्ह्यातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहे. हरियाणातील अशांत परिस्थिती पाहता देशाची राजधानी दिल्लीमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

दिल्लीच्या अनेक भागात पोलिस आणि पॅरामिलिट्री तैनात करण्यात आली आहे. कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी ही तयारी केली जात आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी VHP दिल्ली-फरीदाबाद रस्ता बंद केल्याची माहिती आहे. बदरपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते नूह हिंसाचाराच्या विरोधात संपूर्ण देशात निदर्शने करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एकूण 29 ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद निदर्शने करण्याच्या तयारीत आहे. नूह आणि त्यानंतर हरियाणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारा संदर्भात NIA कडून चौकशी व्हाही अशी मागणी केली जात आहे. गुरुग्राममध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जमावाने एका मशिदीला आग लावली होती. ज्यात एका मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण अधिक तापलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम