लग्नानंतर ‘या’ अभिनेत्रीचे झाले चांगलेच भांडण !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ । गेल्या काही महिन्यापासून आपल्या लग्नानिमित्ताने चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा आडवाणी कबीर सिंग हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लग्नापासून या जोडीची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगते. परंतु, यावेळी दोघांच्या लग्नानंतर झालेल्या भांडणाची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थ-कियाराची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली होती. हीच केमिस्ट्री ऑफ स्क्रीनही चाहत्यांना पाहायला मिळते. कियारा आणि सिद्धार्थने लग्नाआधी कधीही त्यांचं नातं स्विकारलं नव्हत. आता कियाराने खुलासा केला आहे की सिद्धार्थला त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे नव्हते.

कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावतो आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं. कियाराने मुलाखतीत सांगितले की, ”सिद्धार्थला तिने पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे नव्हते. विशेषतः तिने पोस्ट केलेला व्हिडिओ. कियाराने सांगितले की, हा व्हिडीओ पोस्ट करण्यावरून बरेच वाद झाले. सिड एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे.”

सिद्धार्थ आणि कियारा या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. लग्नाचे फोटो शेअर करताना कियारा आणि सिद्धार्थने लिहिले – आता आमचे कायमचे बुकिंग झाले आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थ लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट शशांक खेतानचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ लवकरच शंशाक खेतान या सिनेमाची घोषणा करणार आहेत. जुलै महिन्यात ते चित्रपटासाठी वर्क शॉप सुरू करणार आहेत. या वर्कशॉपनंतर ऑगस्टमध्ये शूटिंगला सुरुवात करणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम