सनी देओलचा मुलगा चढला बोहल्यावर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  आपल्या वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेता सनी देओल आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलने आज त्याची दीर्घकाळाची मैत्रीण दृशा आचार्यसोबत लग्न केले. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही लग्नमंडपात बसलेले दिसत आहेत. यादरम्यान दिशा लाल लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. दृशा ही गतकाळातील प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची नात आहे. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.

धर्मेंद्र आपल्या नातवाच्या लग्नाच्या वरातीत नाचताना दिसले. यावेळी ते ब्राऊन कलरच्या सूटमध्ये दिसले. मिरवणुकीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुपरस्टार धर्मेंद्र, अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल व्हिडिओमध्ये एकत्र दिसले. दुसऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव करणची झलकही पाहायला मिळाली. करण घोडीवर स्वार होऊन लग्नस्थळी पोहोचला. दरम्यान, करण क्रीम शेरवानी आणि मॅचिंग पगडीमध्ये दिसला. या लग्नात फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. सनी देओल आपल्या मुलाच्या लग्नात खूप आनंदी दिसत होता. त्याने पांढऱ्या आणि हलक्या हिरव्या रंगाची कॉम्बिनेशन शेरवानी घातली आहे, त्यासोबत त्याने लाल फेटाही बांधला आहे. तर काका बॉबी देओल पांढऱ्या शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम