आरोपानंतर आव्हाड भावूक म्हणाले राजकारण नकोच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आ.जीतेद्र आव्हाड वेगवेगळ्या वादात सापडत आहे त्यांच्यावर नुकताच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आ.आव्हाड यांनी सांगतिले कि, मी राजीनामा देत असल्याचे जाहीर करताच राज्यातील राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत त्यांना समर्थन दिले होते. तर त्यानंतर आ.आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत ते भावूक झाल्याचे दिसत होते.

माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 354 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आरोप फेटाळून लावले.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मला जे कलम लावलेले त्याच्याबद्दल वाईट वाटलं. माझ्या खूनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मान्य नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले. भादंवि हे 354 कलम लावणे हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचारतात की विनयभंगाची केस तुझ्या वडिलांवर? त्यापेक्षा राजकारणात नकोच असेही त्यांनी म्हटले.

समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आले. राजकारण करावे पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली असे आव्हाड यांनी सांगितले. माझ्याविरोधात ओढूनताणून गुन्हा नोंदवला जात आहे. काहीही कारण नसताना आम्हाला कोठडीत ठेवले. त्यामुळे आम्ही माफी मागणार नाही असेही त्यांनी म्हटले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम