नवरदेवाच्या चौकशीनंतर वधू पक्षाने मारला कपाळाला हात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । दोन दिवसा आधीच राज्यातील एका विवाह सोहळा मोठा चर्चेत आला होता. दोन नवरी व एक नवरदेव असा विवाह सोहळ्याचे व्हिडीओ राज्यात प्रंचड व्हायरल झाले होते. पण त्यानंतर नवरदेवावर गुन्हा दाखल झाला होता आता नवरदेवाची चौकशी झाली असता मोठी माहिती समोर आल्याने वधू पक्षाने कपाळाला हात मारला आहे.

मुंबईच्या जुळ्या बहिणींशी या तरुणाने लग्न केलं आणि अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागणार आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम