कॉंग्रेसला बसणार धक्का : नेता काढणार नवीन पक्ष !
दै. बातमीदार । ३ जून २०२३ । देशातील कॉंग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर आता पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला धक्का देण्याची जोरदार तयारी सुरु असल्याची चर्चा देशभर सुरु झाली आहे. पक्षातील एक दिग्गज नेता नाराज झाल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसमधील नेते सचिन पायलट स्वत:चा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. पालयट यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या IPAC ची सेवा देखील घेतली आहे. IPAC ही प्रशांत किशोर यांची संघटना आहे, ज्याने अनेक पक्षांना पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार इत्यादी निवडणुका जिंकण्यास मदत केली आहे. आता यानंतर पायलट दोन ते तीन आठवड्यांत स्वतःचा राजकीय पक्ष सुरू करणार आहे.
आयपीएसीशी संबंधित इतर दोन लोकांनीही पुष्टी केली आहे की ही संस्था सचिन पायलटला त्यांचा नवीन पक्ष तयार करण्यासाठी मदत करत आहे. या दोन लोकांमध्ये एक माजी कर्मचारी असून एक सध्याचा आहे. “IPAC चे 100 लोक सध्या सचिनसोबत काम करत आहेत. आम्हाला आणखी 1,100 लोकांना कामावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. सचिन पायलट जूनमध्येच त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात, असा दावाही करण्यात आला आहे. राजस्थानात सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहे. या वादावर अंतिम तोडगा अजूनही निघाला नाही. पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थानंतर दोन्ही गटात तोडगा निघतो, काही काळ जातो अन् पुन्हा वाद सुरु होतो.
राज्यातील बदलत्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी सुखविंदर सिंह रंधावा यांनी दिल्लीत प्रदेश अध्यक्ष आणि सह प्रभारी यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गोंविद सिंह डोटासरा देखील सामील झाले होते. परंतु या बैठकीत दोन्ही नेत्यांमधील वादावर काय झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम