महिलेच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांना आली जाग ; घेतला निर्णय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  राज्यातील जनता आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी थेट मुख्यमंत्रीपर्यत पोहचत आहेत. त्यामुळे सोमवारी एकाच दिवशी तीन जणांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी उपचारादरम्यान विष घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा, असे आदेश सर्व मंत्र्यांना दिले आहेत तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी केले. मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातील ठरावीक दिवस व वेळ निश्चित करावी. त्याची कल्पना अभ्यागतांना यावी, म्हणून भेटीचा दिवस व वेळेची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. लाेकांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका, असे निर्देश दिले आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम