उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने कार्यकर्त्यांची घुसमट – आ.आशीष शेलार

मुंबईतील उबाठा गटातील अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुखांचा भाजपा मध्ये प्रवेश

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याने सामान्य कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने हे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, असे मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी शुक्रवारी सांगितले.

चेंबूर व गोवंडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटातील उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख अशा 200 हून अधिक जणांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या वेळी आ. शेलार पत्रकारांशी बोलत होते.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर,जगदीश पराडकर, महादेव शिगवण, नीरज उभारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यालय प्रमुख राजेंद्र भोईर, उपशाखा प्रमुख आनंद नलावडे, संतोष मिटकर, संजय वैती, प्रफुल्ल ठाकूर, रमेश उगले, गटप्रमुख राजेंद्र पवार, संजीव वर्तक,विठ्ठल जाधव, उपशाखा प्रमुख जगदीश पंडित, अर्चना गावंड,अंजली पाटील आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम