कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केला पोळा सण साजरा

शेतकरी बांधवांना दिल्या सुभेच्छा

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि २७ ऑगस्ट |  कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे पोळा सण साजरा केला. पोळा सणानिमित्त मंत्री अब्दुल सत्तार यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी त्यांच्या शेतातील बैल जोडींचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. यावेळी त्यांनी पोळा व पाडवा सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

अधिवेशन संपल्यानंतर आज सकाळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सिल्लोडला आगमन झाले. यावेळी त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेवून संवाद साधला. त्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या शेतातील बैल जोडीचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. त्यानंतर सिल्लोड व परिसरातील विविध ठिकाणी पोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री सत्तार यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम