कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन

१ कोटी ९० लाख रूपयांच्या कामाला मंजूरी

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि २९ ऑगस्ट |  उपळी ते दिडगाव रस्त्यावरील गावाजवळील अंजना नदीवरील पुलाची दुरुस्ती करणे 50 लाख, उपळी येथे तलाठी कार्यालय व निवस्थान बांधकाम करणे 24.50 लाख, पाणंदरस्ते विकास अंतर्गत उपळी ते सिसारखेडा रस्ता करणे 34.50 लाख, उपळी ते वाघधाववाडी पाणंद रस्ता करणे 46 लाख, सिसारखेडा ते उपळीरस्ता पाणंदरस्ता करणे 34.50 लाख असे एकूण 1 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांचे उदघाटन ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

 

यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, शिवसेना मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे, जिल्हा उपप्रमुख अमर लोखंडे, ज्ञानेश्वर गायके,चैतन्य देशमुख, ज्ञानेश्वर गायके, नितीन हिलाल , गोविंद कुमार, डॉ. मोहिज देशपांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, प.स. माजी उपसभापती अजीज बागवान, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतिष ताठे ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सिल्लोड तालुकाप्रमुख सुनील पांढरे तसेच तालुका उपप्रमुख समाधान गायकवाड यांच्यासह म्हसला गावचे सरपंच सुखदेव सपकाळ, केरहाळाचे सरपंच दत्ता कुडके, रवी काळे, मुरलीधर शेजुळ, प्रदीप शेजुळ, राम कुटे, विठ्ठल गायकवाड, योगेश फोलाने, जनार्धन शेजुळ, राजेंद्र शेजुळ, राजीव सुरडकर, गणपत औटी, भगवान फोलाने, ऋषिकेश शेजुळ, बंडू काकरवाल, रामराव फोलाने, पप्पू शेजुळ, काशीनाथ सुरडकर, प्रदीप शेजुळ आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम