शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटील, तर लोकसभा संघटकपदी करण पवार

बातमी शेअर करा...

शिवसेना  जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटील, तर लोकसभा संघटकपदी करण पवार
पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या रणनीती
जळगाव प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ने जिल्हा पातळीवरील संघटनेत मोठा बदल करत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना जिल्हाप्रमुखपदी, तर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना जळगाव लोकसभा संघटकपदी नियुक्त केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव गट) संघटनात्मक बदलांच्या प्रक्रियेत आहे. याच पार्श्वभूमीवर, माजी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्हाप्रमुख पद रिक्त होते. आता पक्षाने ही जबाबदारी कुलभूषण पाटील यांच्यावर सोपवली आहे.

कुलभूषण पाटील यांनी गेल्या जळगाव विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे करण पवार यांनीही जळगाव लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Join WhatsApp Group