अजिंक्य रहाणेचा चाहत्यांना मोठा धक्का

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  देशाच्या इंडिया टीमने नुकतेच वेस्ट इंडिज विरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका ही 1-0 ने जिंकली. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ वाया गेला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. पावसाने विंडिजची लाज राखली. तर टीम इंडियाला असलेली व्हॉईटवॉश देण्याची संधी पावसाने हिरावून घेतली.

या कसोटी मालिकेत डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकूटाने शतकी खेळी केली. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाची लाज राखलेल्या अजिंक्य रहाणे याला विशेष काही करता आलं नाही. रहाणेने कसोटी मालिकेनंतर परतल्यावर मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघापासून जवळपास 17 ते 18 महिने दूर होता. मात्र आयपीएल 16 व्या मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आपली छाप सोडली. त्यानंतर रहाणेची टीम इंडियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली. विंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी रहाणेला उपकर्णधार करण्यात आलं. या मालिकेत रहाणेने निराशा केली.

विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रहाणे काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार होता. मात्र रहाणेने क्रिकेट क्लब लिस्टेटरशायरमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. रहाणे आणि लिसेस्टरशायर यांच्यात करार झाला होतो. करारानुसार, रहाणेला पुढील महिन्यात होणाऱ्या मेट्रो बँक वनडे कपही खेळायचा होता. अजिंक्य रहाणे याने क्रिकेटपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. लिसेस्टरशायर क्लबने एक प्रसिद्धपत्रक जाहीर केलंय. त्यानुसार, “अजिंक्य रहाणे जून महिन्यात खेळायला येणार होता. मात्र नॅशनल ड्युटीमुळे रहाणेने आपलं नाव मागे घेतलं. तसेच रहाणेने ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केलीय”, असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. त्यामुळे आता रहाणेच्या जागी पीटर हॅंड्सकॉम्ब याचा समावेश करण्यात आला आहे.

रहाणेने जानेवारी महिन्यात लीसेस्टशरसोबत करार केला होता. त्यानुसार रहाणेला जून ते सप्टेंबर दरम्यान एकूण 8 फर्स्ट क्लास सामन्यांसह रॉयल लंडन कप स्पर्धेत खेळायचं होतं. मात्र टीम इंडियात कमबॅक झाल्याने त्याला काउंटी टीममध्ये सामील होता आलं नाही. दरम्यान रहाणेने आतापर्यंत टीम इंडियाचं 85 कसोटी, 90 ओडीआय आणि 20 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रहाणेने टेस्टमध्ये 5 हजार 77, वनडेत 2 हजार 962 आणि टी 20 मध्ये 365 धावा केल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम