अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले गायरान जमीन घोटाळ्यात…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन सुरु असतांना गायरान जमीन घोटाळ्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे सरकारमधील आणखी 3 मंत्र्यांचा सहभाग आहे, असा गंभीर आरोप आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले, गायरान जमीन घोटाळ्यात सरकारमधील तीनेक मंत्री सहभागी आहेत, अशी माहिती आहे. याविषयीचे कागदपत्र, पुरावे आम्ही जमा करत आहोत. सबळ पुरावे मिळताच या मंत्र्यांची नावे जाहीर करू. तसेच, विधानसभेतही हा मुद्दा मांडू. अजित पवार म्हणाले, आज काही स्थानिक वृत्तपत्रांत गायरान जमीन घोटाळ्यात आणखी काही मंत्र्यांचा सहभाग असल्याचे छापून आले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणावर हायकोर्टानेही शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. फक्त पुराव्यांशिवाय आम्हीही केलेले आरोप म्हणजे फुसका बार ठरू नये, असे वाटते. त्यामुळेच संपूर्ण माहिती घेतल्यानंतर याविषयी सविस्तर माहिती देऊ. गायरान जमीन घोटाळ्यावरुन अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी विधिमंडळात केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काल म्हणाले की, यापूर्वी रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर इथेही अब्दुल सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, बाजार समिती भूखंडाचे वाटप केले. अशा मंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम