अजित पवार ॲक्शन मोडमध्ये : पहाटे मंत्रालयात झाले दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असून त्याबाबत प्रशासन नियोजन करीत आहे. सध्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने आता पहाटेपासून कारभार सुरु झाल्याचे चित्र मंत्रालयात दिसू लागला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच विधान भवनात पोहोचले आणि त्यांनी रायगड जिल्ह्यात झालेल्या दुर्घटने संदर्भात आढावा घेतला. सकाळीचे रायगड जिल्ह्यात इरशाळवाडी येथे प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू झाले आहे. या मदत कार्यात येणाऱ्या अडथळे आणि पुढील उपाययोजना या संदर्भात त्यांनी महत्त्वाच्या सूचना देखील केल्या. राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून अजित पवार हे सकाळीच विधान भवन परिसरात दाखल होत आहेत. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आज देखील अजित पवार सकाळीच विधान भवन परिसरामध्ये दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत इरसाळवाडी येथे सुरू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच या संदर्भात अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडीवर दरड कोसळून 25 घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (ता. 20) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम