अजित पवारांकडून आमदारांना ब्लॅकमेलिंग सुरु ; रोहित पवारांची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर आता आमदार फोडण्याचे काम सुरु असल्याचे विरोधकाकडून जोरदार टीका होत आहे. सध्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाकडे जास्त संख्याबळ याची चर्चा रंगली आहे. मात्र, आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच शरद पवार गटातील आणखी एका खासदाराने आणि आमदाराने अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केला आहे. काही नेत्यांना ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सही कर नाहीतर अमुक अमुक काम होणार नाही, अशी धमकीही दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच गेला का? हे पाहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. आमदारांचे एखादे महत्त्वाचे काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केले जात नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना आपत्र करण्यात यावे, अशी मागणी करत अजित पवार गटाने विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. त्यावरही आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केले आहे. रोहित पवार म्हणाले की, काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर हे करण्यात आले असेल. त्यांची ती रणनिती असेल आम्ही आम्ही कारवाई करत आहोत. हा लढा कोर्टात जाईल आणि विजय आमचा होईल, असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम