अजित पवारांसह पत्नीचे नाव वगळले ; सहकारी बँक घोटाळ्यात या नावांचा समावेश !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ सप्टेबर २०२३ | राज्यात मागील काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा चांगलाच गाजला होता. आता या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात एकूण 14 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आरोप पत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नीचे नाव वगळण्यात आले आहे. या विषयीची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका नेत्याचे नाव देखील असल्याचे सांगण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात शरद पवार गटामध्ये असलेले प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या भावाच्या नावाचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. आणखी कोणी आरोपी आढळल्यास पुन्हा पुरवणी आरोपपत्राद्वारे नावाचा समावेश केला जाऊ शकतो, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ईडीच्या वतीने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण 14 नावांचा समावेश आहे. यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्या नावांना वगळण्यात आले आहे. तर सुभाष देशमुख, रणजीत देशमुख इत्यादी मोठी नावे यादीमध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. कारखाने कमी पैशात खरेदी करणे आणि विक्री प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे न राबवणे हा मूळ ठपका ईडीने या प्रकरणात ठेवला होता. याप्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या नावांचा समावेश
प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज, समीर मुळे, अर्जून खोतकर यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम