बागेश्वर बाबांवर अजित पवारांचा हल्लाबोल !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जानेवारी २०२३ ।सध्या देशात जोरदार चर्चेत आलेले धीरेंद्र शास्त्रीं यांनी विविध दावे करीत त्यांनी थेट महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले होते त्यावर नंतर राज्यातील राजकारणातून विविध प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या तर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आज त्यांचावर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले की महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात नव्या कायद्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. आगामी अधिवेशनात या संदर्भात मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाकडून देहू संस्थान येथे आंदोलन करुन धीरेंद्र शास्त्रींचा (बागेश्वर बाबा) निषेध करण्यात आला होता. यानंतर बोलताना अजित पवारांनी धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी केलेल्या वक्तव्य हे निषेधार्ह असून त्यामुळे व्यथित झालो असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो असे सांगताना आम्ही आगामी अधिवेशनात बेताल वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी एक कायदा करावा अशी मागणी करणार आहोत असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. या वक्तव्याप्रकरणी धीरेंद्र महाराज (बागेश्वर बाबा) यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील अजित पवारांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करण्याचे काही जणांचे काम जाणीवपूर्वक चालले आहे. यामुळे महत्त्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 27 फेब्रुवारीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हा या प्रकरणी आम्ही कायदा करावा अशी मागणी केली आहे. महारापुरुषांच्या विरोधात जे वाचाळवीर बोलत असतात, यामुळे राज्यात वातावरण खराब होत आहे, कुणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे कायदा हातात घेतला जातो, कोण शाई फकण्याचा प्रयत्न करतो हे सर्व थांबविण्यासाठी महापुरुषांवचा अपमान होऊ नये यासाठी कायदा केला पाहिजे असे अजित पवारांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम