भाजपला धक्का तर अजित पवार गटाचे वर्चस्व कायम !
बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३
राज्यात नुकतेच रविवार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. काटेवाडीत ग्रामपंचायतीच्या सर्व १६ जागांसाठी मतदान पार पडलं. काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. तर आज आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १३ जागांवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे.
तर याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘आता सुरुवात झालीय, पुढे पाहावं लागेल कशा पद्धतीने निकाल लागतील. स्वतःची पाठ थोपटून घेतात हे योग्य नाही. पैशाचा वापर ग्रामपंचायतीमध्ये केला गेला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तर आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बारामतीमध्ये आमबी बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी, गाडी खेल, जराडवाडी, करंजे, कुतवल वाडी,सिद्धेश्वर निंबोडी, दंडवाडी, मगर वाडी, साबळे वाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम