अजित पवारांचा दौरा रद्द ; भाजप प्रदेशाध्यक्ष दिल्ली रवाना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यातील विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांच्यावर आता राज्यातील राजकारण सुरु असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यापासून रंगत असतांना नुकतेच शरद पवार यांनी वैयत्कीत निर्णय घेवू शकतात असे वक्तव्य केल्याने आणखी या चर्चला उत आला होता तर आज अजित पवार यांनी आपला सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार हे सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार होते, मात्र त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम रद्द एकीकडे अजित पवार यांचे सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला पोहोचले आहेत.

बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया दरम्यान एकीकडे अजित पवार हे भाजपवर नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नागपूरमध्ये काल झालेल्या सभेत देखील अजित पवार बोलले नाहीत, त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आलं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार नाराज नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार अजिबात नारज नाहीत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची जी सभा झाली त्या सभेत जयंत पाटील बोलले नाहीत मग ते नाराज होते असं म्हणायचं का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मविआच्या प्रत्येक सभेत दोनच जण बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं. यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या सर्व आफवा आहेत. ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगड मारतात. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील अजित पवार हे भाजपसोबत जातील असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम