स्वातंत्र्याचा अमृत महोत्सानिमित्त अखिल भारतीय पातळीवरील मुशायरा उत्साहात …. -मान्यवरांना समजरतन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)स्वातंत्र्य सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रह.) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररी अमळनेर या सामाजिक संस्थे मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय पातळीवरील मुशायरा चे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल अमळनेर येथे करण्यात आले होते या कवी सम्मेलनात मालेगांव, धुळे,बुरहानपुर, चोपडा अमळनेर सह आदि भागातुन कवी उपस्थित होते, देशाच्या आजादीला ७५ वर्ष पूर्ण झाले संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला याचा निमित्ताने हे कवी सम्मेलन आयोजित करण्यात आला होता उपस्थित कवींनी उपस्थितांचे मने जिंकली व देश भक्ती आणि हिंदू मुस्लिम एकतेवर कविता साजरी केली याच कार्यक्रमात अंमळनेर व जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांना ते करीत असलेल्या सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, इकरा संस्था अध्यक्ष अब्दुल करीम सालार सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे र अल्पसंख्यांकांचे नेते एजाज मलिका, मझहर पठाण व अब्दुल ट्रान्सपोर्ट जळगांव चे अनवर खान यांचा समावेश होता.
अल्लामा फजले हक खैराबादी संस्थेचे अध्यक्ष रियाज शेख यांनी या पुरस्काराबाबत प्रास्ताविक विशद करून समाज रत्न पुरस्कार संबंधितांना का देण्यात आला त्याबद्दल सविस्तर अशी माहिती विशद केली.पुरस्कारचे वितरण फजले हक खैराबादी रहे एस टी डी सेंटर व पब्लिक लायब्ररी चे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस मा आमदार शिरीष दादा चौधरी,खाशि मंडळाचे चेअरमन हरी भिका वाणी, निरीक्षक जयपाल हिरे, डॉ अनिल शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, प्रा अशोक पवार, पन्नालाल मावळे,चेतन शहा,गौतम मोरे,‌ मुख्तार खाटीक,हाजी नसीरोदीन शेख, मोहम्मद शफी भाया तेली, अँड अब्दुल रज्जाक शेख, अँड रियाज काझी, सह आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अध्यक्ष रियाज मौलाना, मोहम्मद इकबाल शेख, ताहेर शेख, अलिम मुजावर, जाकिर शेख धार, रहिम मिस्त्री, मुस्तफा सेठ, कमा प्लंबर, इम्रान खाटीक, रियाज ठेकेदार,सह आदिनीं परिश्रम घेतले कार्यक्रमात सुत्रसंचलन जळगांव येथील साबिर मुस्तफा आबादी यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड रियाज काझी यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम