अक्षयने या अभिनेत्रीसोबत काम न करण्याची घेतली आहे शपथ ; वाचून व्हाल थक्क !
दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ । बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्यामधील वाद नेहमीच बाहेर येत असतो पण कधी कधी हा वाद इतक्या टोकाला पोहचत असतो कि एकमेकासोबत काम करण्यासाठी ते शपथच घेत असतात अशीच शपथ अक्षय कुमारने देखील एका अभिनेत्री सोबत घेतली आहे का ? अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी हे दोघेही बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. दोघे इतके वर्ष झाले इंडस्ट्रीत सक्रिय असून सुद्धा दोघांनी एकदाही सोबत काम केलं नाहीये.
अक्षय कुमारने 1991 मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. त्याचवेळी राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट ‘राजा की आयेगी बारात’ होता. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. राणी-अक्षयची कारकीर्द 3 दशकांची आहे. पण हे दोघे कधीही एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. यामागचे कारण दुसरे तिसरे काही नसून त्यांचे हेट रिलेशन आहे. अक्षय आणि राणी यांच्यातील हा संघर्ष इतका वाढला की अक्षयने पुन्हा कधीही राणीसोबत काम न करण्याची शपथ घेतली. हे सर्व सुरू झाले जेव्हा अक्षय कुमार नवोदित होता आणि 1996 मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ मध्ये कास्ट झाला होता.
अक्षय कुमारने इंडस्ट्रीत कोणीही ओळखीचं नसताना स्वतःच्या बळावर ओळख निर्माण केली. तर दुसरीकडे राणी मुखर्जीची पार्श्वभूमी फिल्मी होती. राणीचे वडील दिवंगत राम मुखर्जी हे बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते, तर तिची आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीला 1996 मध्ये आलेल्या ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटात त्याच्यासोबत कास्ट करण्याची निर्मात्यांची इच्छा होती.
मात्र, चित्रपटात अक्षयचे नाव पाहून राणीने अभिनय करण्यास नकार दिला. राणी मुखर्जीला कोणत्याही नवोदित व्यक्तीसोबत काम करायचे नव्हते, असे म्हटले जाते. नंतर रवीना टंडनला ही भूमिका मिळाली पण त्याचा अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी यांच्या नात्यावर खोलवर परिणाम झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो सुपरहिट ठरला.
‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटानंतर 1999 मध्ये आलेल्या ‘संघर्ष’ चित्रपटात पुन्हा एकदा राणी-अक्षयची जोडी बनता बनता राहिली. या चित्रपटात अक्षयच्या विरुद्ध राणी मुखर्जी होती, मात्र राणीने अक्षयला पाहताच तिने चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर या चित्रपटात अक्षयच्या विरुद्ध प्रीती झिंटाने सर्वांची मनं जिंकली आणि अक्षयचा चित्रपटही हिट ठरला. 2002 मध्ये आलेल्या ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटात राणीने तिसऱ्यांदा काम करण्यास नकार दिला होता.
राणीने एकापाठोपाठ तीन चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिल्याने अक्षयने तिच्यासोबत पुन्हा कधीही काम न करण्याची शपथ घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘लागा चुनरी में दाग’, ‘ता रा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ फ्लॉप झाल्यानंतर जेव्हा राणीचे करिअर बुडू लागले आणि अक्षय आणि राणीचे परस्पर वैर संपवण्यासाठी दिग्दर्शक आदित्य चोप्राने एक मोठी योजना आखली. त्या काळात राणी आदित्य चोप्राला डेट करत होती आणि त्यानंतर अक्षय कुमार सुपरस्टार झाला होता. प्रत्येकाला त्याच्यासोबत चित्रपट करायचे होते. त्यामुळे राणीचे करिअर वाचवण्यासाठी आदित्यने अक्षयसोबत चित्रपट करण्याचा प्रयत्न केला पण अक्षयने हा चित्रपट करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा आवडल्यानंतरही अक्षयने चित्रपटात राणी असल्याचे ऐकले आणि त्याने चित्रपट करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजतकपर्यंत अक्षय-राणी कधीच एकत्र दिसले नाहीत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम