दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अक्षय कुमार यांचा पृथ्वीराज चौहान हा सिनेमा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तर अक्षयने अनेकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्टने देखील लक्ष वेधून घेतले आहे. तर आता आलेला फोटो देखील अक्षय व भाजपचे मैत्रीचे नाते दिसल्याचे दिसून येत आहे.
अक्षयनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला निरखून पाहिलं तर अक्षयच्या समोर दूरवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दिसत आहे. अर्थात यावरनं स्पष्ट होतंय अक्षय गुजरातच्या भूमीत आहे,मोदींच्या राज्यात. त्यानं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळचा निसर्ग आपल्या कॅमेऱ्यात टीपत फोटोला कॅप्शन दिलं आहे की,”मी एकता नगर मध्ये आहे. ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’, जगातल्या सर्वात उंच स्टॅच्यूजवळ आहे. इथे निसर्गाच्या कुशीत अनेक गोष्टींचा आनंद घेण्यासारखा आहे. तुम्ही भेट दिलीय का?”, असं म्हणत अक्षयनं लोकांना त्या ठिकाणाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
आता एकार्थानं अक्षय गुजरातची,तिथल्या निसर्गाची प्रशंसा करत स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देण्याचं लोकांना सुचित करत आहे, म्हणजे गुजरातचं प्रमोशन करत आहे असं म्हटलं तरी चुकीच ठरू नये. अक्षय संधी मिळेल तेव्हा मोदीविषयींचे आपले प्रेम या ना त्या कारणानं व्यक्त करत असतो,हे यावरनं पुन्हा स्पष्ट झालं. अक्षयच्या या फोटोवर लोकांनी मात्र प्रतिक्रिया नोंदवताना त्याला ‘हेराफेरी ३’ मध्ये काम करण्याची विनवणी देखील केली आहे.
अक्षय कुमारनं आपल्या मानधनात ४० टक्क्यांनी कपात केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. त्यानं स्वतः एका कार्यक्रमात हे जाहीर केलं. यामागचं कारण सांगताना मंदीचा मुद्दा त्यानं उचलून धरला. प्रेक्षकांवर भार पडू नये म्हणून आपण मानधन कमी करतोय असा कुठेतरी त्याचा म्हणण्याचा अर्थ होता. अक्षयनं २०२२ मध्ये केलेले सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले ज्या प्रत्येकासाठी त्यानं १०० करोड ते १३५ करोड चार्ज केले होते. पण आता कुठे जाऊन त्याला शहाणपण सुचलंय हे देखील नसे थोडके. अक्षयचा ‘रामसेतू’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यालाही फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम