
अलका सरदार यांची जळगाव जिल्हा आदिवासी विभाग च्या कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी पदी विजयी
भडगाव(प्रतिनिधी)
जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटी मर्या.ता. जि.जळगाव.पंचवार्षिक निवडणूक सन -2022-2027 साठी निवडणूक घेण्यात आली यामध्ये सहकार पँनल कडून चाळीसगाव तालुक्यातील वलठाण शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती अलका वामन सरदार या महिला राखीव मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्या यावेळी सहकार पँनल चे नेतृत्व अशोक माळी सरांनी केले श्रीमती अलका सरदार मँडम यांचे अनेक सामाजिक कामात पुढे राहतात ,सरदार मँडम यांनी काही काळ सार्वे ता.पाचोरा येथे सेवा दिली जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील विविध कर्मचारी वर्गाला नेहमी मदत व सहकार्य करत असतात त्यामुळे एवढे भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत या निवडीने अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी व शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण ता.चाळीसगाव सर्व कर्मचारी वर्गाकडून श्रीमती अलका सरदार यांचा सत्कार करण्यात आला

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम