अल्लू अर्जुनने या कारणासाठी शाहरुखची ऑफर फेटाळली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । देशभर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट गाजल्यानंतर त्याला अनेक ऑफर आल्या पण त्याने त्या नाकारल्याचे कारण समोर आले आहे. सुपरहिट ‘पुष्पा’ सिनेमानंतर आता अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अल्लू अर्जुनने नुकतीच शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमाची ऑफर नाकारली होती, या सिनेमात शाहरुख खान लीड रोल मध्ये दिसणार आहे. मात्र आता अल्लू अर्जुनने जवान सिनेमा नाकारण्याचे कारण समोर आले आहे.

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांचे दिग्दर्शन असलेले शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाबाबत चाहत्यांची क्रेझ तेव्हा वाढली जेव्हा सिनेमात ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन ही दिसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र अॅटलीच्या या ऑफऱला अल्लूने नकार दिला. अल्लूला सिनेमात खास कॅमियोसाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ही ऑफर नाकारली.

अल्लू अर्जुनने बऱ्याच कारणांमुळे जवान सिनेमाची ऑफर नाकारली. ज्यामध्ये एक ‘पुष्पा 2’ आहे. पिंकविल्लाच्या वृत्तानुसार, ‘पुष्पा 2’ साठी तो प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही अन्य प्रोजेक्टसाठी वेळ नाही आहे. या व्यतिरिक्त ‘पुष्पा 2’ ची शुटींग विजाग आणि हैदराबादमध्ये सुरु आहे. त्यावेळी शाहरुखच्या जवान सिनेमात छोट्याशा रोलबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी अल्लूने त्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्यासाठी ‘पुष्पा 2’ च्या प्रशिक्षणासोबत वेळ मॅनेज करणे कठिण होत आहे. अल्लू अर्जुन या दिवशी ‘पुष्पा 2’ व्यतिरिक्त कोणताही अन्य प्रोजेक्ट करत नाही. सिनेमामध्ये रश्मीका मंदाना आणि फहद फासिल महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबत साई पल्लवीही दिसणार असल्याची बातमी होती. मात्र मेकर्सकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

शाहरुख खानच्य़ा ‘पठान’ हा सिनेमा ब्लॉकबास्टर ठरला आहे. आता त्याचा पुढचा सिनेमा ‘जवान’ आहे. या सिनेमात शाहरुख डबल रोलमध्ये दिसणार आहे. यासोबत नयनतारा आणि विजय सेतुपतीही या सिनेमात दिसणार आहेत. देशात मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे सिनेमाची शुटींग सुरु आहे. जवान सिनेमा 2 जून 2023 ला प्रदर्शित होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम