एकबोटे पुत्र करतोय ‘या’ अभिनेत्री डेट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ |  मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक वर्षापूर्वी दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा अश्विनी एकबोटे हे नेहमी काही ना काही चर्चेत येत असतात. या अभिनेत्रीचा अभिनय पाहून त्यांचे अनेक चाहते झाले आहे. सध्या याच अभिनेत्रीचा मुलगा शुभंकर एकबोटे हा देखील कलाविश्वात कार्यरत असून आईच्या पावलांवर पाऊल टाकत शुभंकरदेखील अभिनय क्षेत्रात दाखल झाला आहे.

सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत शुभंकरने राणाचे पात्र साकारले आहे. याच मालिकेच्या नायिकेसोबत शुभंकर प्रेमात असल्याचे बोलले जात आहे. कन्यादान या मालिकेत वृंदाची भूमिका अमृता बाणे हिने निभावली आहे. शुभंकर एकबोटे आणि अमृता बाणे दोघेही अनेकदा एकत्र फिरायला जाताना दिसतात. दोघांचे एकत्रित फिरायला जातानाचे व्हिडीओ हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावरून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. आज शुभंकरचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून अमृताने शुभंकरला शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृताने लव्ह इमोजी शेअर केल्यामुळे हे दोघे प्रेमात आहेत असे बोलले जात आहे. अर्थात या दोघांनी आपले नाते अद्याप जगजाहीर केलेले नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम