गावठी पिस्तूल व हत्यारासह एकास अटक…

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) अमळनेर पो.नि.विजय शिंदे यानां पेट्रोलिंग दरम्यान गोपणीय बातमी मिळाली की अमळनेर शहरात पैलाड भागातील अमळनेर ते चोपडा रोड लगत असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिर मध्ये इसम नामे अविनाश बाळु शिरसाट वय२६ रा. वाडी बु. ता. शिरपुर जिल्हा धुळे हा विना परवाना एक गावठी बनावटीचे ६ बोर चे एक रिव्हालवर, चाकु, फायटर, दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २७,८००/- कि.चा एवज कब्जात बाळगुन मिळुन आल्याने त्याचेवर विरुध्द पोना डॉ शरद तुकाराम पाटील यानी फिर्याद दिले वरुन अमळनेर पोस्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह म.पो. का. क. १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानीं स्वता समक्ष त्याचे पथकातील अमलदार पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेका किशोर पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिध्दांत बलवंत सिसोदे ,शरद पाटील ,यानीं केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम