अमळनेर शहरात दोन गटात दंगल दोन्हीं गटा कडून एकमेका विरूद्ध गुन्हे दाखल… झामि चौकात झाली दगडफेक व दुकानांची तोडफोड…

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)शहरातील झामी चौक परिसरात काल रात्री दोन गटात वाद होत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद थांबला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी सचिन अशोक महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुमारे ३० ते ३५ जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ रोजी संध्याकाळी जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाने भंडारा आयोजित केला होता, त्याचे जेवन आटोपुन स्वयंपाकाचे भांडे घासत होतो. त्यावेळी माळीवाडाकडून ९ रोजी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास झामी चौकाकडे ३० ते ३५ जण मोटारसायकलवर मोठमोठ्याने हॉर्न वाजवत आले. तसेच साहेम टेन्ट हाउस दुकानाजवळ आल्यावर मोटारसायकल थांबवून मोठमोठ्याने घोषणा देवू लागले. त्यावेळी जमावातील एका इसमास मी तसेच माझे सोबतचे मनोज महाजन, शेखर नाथबुवा, गणेश महाजन यंनी तुम्ही आरडाओरड का करत आहात, याबाबत विचारले असता तेवढयात झामी चौकाकडून आमच्या दिशेने नावीद शेख, नइम पठाण, गुलाब नबी, साहील पुर्ण नाव माहीत नाही व इतर ३० ते ३५ अनोळखी लोकांनी दगडफेक करत आम्हाला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी नावीद शेख याने माझे दिशेने दगड फेकुन मारल्याने तो माझे डोक्याला मागील बाजुस लागुन डोके फुटुन मला दुखापत झाली आहे. त्याचवेळी तेथे गल्लीतील आजुबाजुचे पुरुष व महिला आवराआवर करण्यासाठी आले असता त्यांना देखील दगडांचा मार लागला आहे. सदर वेळी चंदनपीर बाबाच्या दर्गा कडील गल्लीतुन देखील जोरात दगडफेक झाल्याने माझे सोबतचे मनोज महाजन व इतर लोकांना तसेच महिलांना देखील मार लागला आहे. माझे डोक्यास मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होत असल्याने गणेश महाजन, शेखर नाथबुवा अशांनी मला औषधोपचारासाठी डॉ. शेलकर यांचेकडे घेवुन गेले. तेथे प्राथमिक औषधोपचार करून मी तक्रार देणेसाठी अमळनेर पोलीस स्टेशनला गेलो, माझे डोक्याचे जखमेतून जास्त रक्तस्त्राव होत असल्याने मला पोलीस स्टेशन मधुन औषधोपचारासाठी मेडिकल मेमो देवुन ग्रामीण रूग्णालय, अमळनेर येथे पाठविण्यात आले आहे.

 

असे तक्रारीत म्हटले आहे. सचिन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नावीद शेख, नइम पठाण, गुलाब नबी, साहील आणि अन्य ३० ते ३५ जण सर्व राहणारे झामी चौक यांच्यावर भादवि कलम ३२४, ३३७, १४३, १४७ आणि १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक गंभीर शिंदे पुढील तपास करीत आहेत. दुसरी फिर्याद मुजमिल अन्सारी यांनी दिली आहे की झामि चौकातील अन्सारी सायकल मार्ट चे रात्री तोडफोड करून दीड लाखाचे नुकसान केले तसेच शेजरील शेख फारूक शेख लतिफ यांच्या सलाईंडीग विंडो या दुकानाचे हि तोडफोड करून तीन लाखाचे नुकसान केले व त्याच्या गल्ली कडे दगडफेक केली व काही लोकांना जखमी केले यात विशाल चौधरी, मनोज ठाकरे, दीपक पाटील, महेश केबलवाला, अजय नाथ बुवा, व इतर १०ते१५ लोकां विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आले आहे या बाबत भा दवी. कलम ४२७,३३७,१४३,१४७, प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.

शहरात शंताता रहावी यासाठी डॉ. प्रवीण मुंडे साहेबांनी घेतली बैठक . पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रसंगी दोन्ही गटातील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलाऊन झामी चौक पोलस चोकित शांतता नांदावी यासाठी बैठक घेतली या वेळीं उपविभगिय पोलीस अधिकारी राकेश जाधव, तहसीलदार मिलंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप गायकवाड, नगरसेवक विनोद लांबोडे, नगरसेवक हाजी शेखां मिस्त्री, दबिर पठाण.

शकील काझी, कादर जनाब, हाजी नासीर, अनिल महाजन, अबू महाजन, अफरोज मुजावर, पत्रकार आबीद शेख, मुन्ना शेख, समाधान मैराळे, नूरखान, आदी उपस्थित होते प्रवीण मुंडे साहेबांनी दोन्हीं समाजाला शांततेत सन सन साजरा करण्या संदर्भात सुचना दिल्या व घटनेत जो कोण्ही दोषी असेल त्यांचावर कठोर करवाई करण्याचे आदेश दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम