रस्ता लुट करणारी टोळी जेरबंद. अमळनेर पोलिसांकडून नागरिकांना आव्हाहन..

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)
अमळनेर दि.०५/११/२०२२ रोजीच्या रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नविन रेल्वे पुलाच्या पुढे एकुन सहा अज्ञात इसम हातात लोखंडी रॉड व दगड घेवुन रोडावर मोठे दगड आडवे लावुन रस्ता लुट करण्यासाठी जमले होते. त्यांनी एका टँकर चालकास मारहान करुन जबरीने लुटल्याने अमळनेर पो.स्टे.गु.र.न. ५१२/२०२२ भा.द.वि. कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच यापुर्वी देखील नमुद ठिकाणी असे लुटमारीचे किरकोळ प्रकार झालेले होते परंतु कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाहीत. तसेच वर दाखल गुन्ह्यांतील अज्ञात इसमांचा ओळख पटविण्या करीता पुरेसा पुरावा उपलब्ध नव्हता.

BJP add

नमुद गुन्ह्यांचा तपास सुरु असतांना पो.नि. जयपाल हिरे यांनी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना / मिलींद भामरे, पोना / सुर्यकांत साळुंखे, पोकों/राहुल पाटील, पोकों / राजेंद्र देशमाने अश्यांना अश्याप्रकारच्या गुन्हे करणारे कार्यपध्दती असलेल्या गुन्हेगांराची माहीती संकलित करुन त्यांच्या कडुन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यादृष्टीने गुन्ह्यांचा तपास चालु असतांना अमळनेर पो.स्टे. रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे कडेस गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरु असतांना त्यातील एकाने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे देवुन वेळ मारुण नेण्याचा प्रयत्न करु लागला त्यावरुन पथकाचा त्याच्या वरील संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यास पो. नि. जयपाल हिरे यांनी विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली देत त्यातील दोघांची नाव पत्ते सांगितले आहेत त्यावरुन आता पर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन आरोपींची फिर्यादी कडुन ओळख परेड बाकी असल्याने त्यांचे नावे उघड करण्यात आली नाहीत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. राजकुमार सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. कृषिकेश रावले सो यांच्या सुचनेप्रमाणे व पो. नि. श्री. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सहा. पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना/ मिलींद भामरे, पोना/सुर्यकांत साळुंखे, पोकों/राहुल पाटील, पोकाँ/ राजेंद्र देशमाने यांनी बजावली आहे.

अमळनेर पोलीसांकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, चोपडा रोड रेल्वे पुलाजवळ कोणासोबत अशा प्रकारची घटना घडुन लुट झाली असल्यास अमळनेर पोलीसांशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम