स्टेट बँक ऑफ इंडियाची भन्नाट ऑफर : स्कीममध्ये होणार डबल पैसे !

बातमी शेअर करा...

बातमीदार \ १७ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक बँक आपल्या नियमित ग्राहकांना विशेष ऑफर देत असतात, देशात सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांसाठी अनेक स्कीम चालविल्या जात आहेत. यात गुंतवणुकीसाठी फिक्सड डिपॉझिटचाही एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ज्यात आपण कुठल्याही जोखमेशिवाय पैसा दुप्पट अथवा डबल करू शकता.

एसबीआयकडून ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्सड डिपॉझिटचा पर्याय मिळतो. यात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची सुविधा मिळते. यात बँक आपल्या ग्राहकांना 3 टक्क्यांपासून ते 6.5 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्क्यांपासून ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

जर आपण एसबीआयमध्ये 10 वर्षांसाठी 1 लाख रुपये फिक्स केले, तर आपले पैसे डबल होतील. एसबीआयच्या एफडी कॅलक्युलेटरनुसार, यावर गुंतवणूकदारांना 6.5 टक्के दराने 90,555 लाख रुपये एवढे व्याज मिळेल. अर्थात गुंतवणूकदाराला 10 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर 90,555 रुपये मिळतील.

बँक वरिष्ठ नागरिकांना 7.5 टक्के दराने व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी एफडी केली तर त्यांचे पैसे डबल होतील. अर्थात, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 10 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची FD केली, तर त्यांना मॅच्युरिटीवर 2,10,234 रुपये मिळतील. यात एकूण 1,10,234 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम