अंबरनाथ नगरपरिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली वेगवान

बातमी शेअर करा...

अंबरनाथ नगरपरिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली वेगवान

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

अंबरनाथ (प्रतिनिधी): अंबरनाथ नगरपरिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.

सत्ता स्थापनेसाठी रणनीतीवर भर

या बैठकीत अंबरनाथच्या स्थानिक राजकारणासह नगरपरिषदेत महायुतीचे वर्चस्व निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि प्रसिद्ध उद्योजक गुणवंत खरोडिया उपस्थित होते. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून शहराचा विकास आणि सत्तेचे समीकरण कसे असेल, यावर या नेत्यांनी सकारात्मक मते मांडली.
नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची चर्चा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत अंबरनाथ शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि महायुतीमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये महायुती भक्कम असून, सत्तेचा दावा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्र प्रयत्न करणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

या बैठकीमुळे अंबरनाथच्या स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ही भेट सकारात्मक झाल्याने लवकरच सत्ता स्थापनेबाबत ठोस निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम