जळगांवमध्ये राबविणार विकासाचा अंबरनाथ पॅटर्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  अंबरनाथ नगरपालिकेने केलेल्या विकासाची भुरळ जळगावच्या नगरसवेकांना पडली आहे. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी अंबरनाथ शहरात जाऊन विविध विकासकामांची पाहणी केली. हाच विकासाचा पॅटर्न जळगाव शहरात राबविला जाणार आहे. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे स्वतः जळगाव शहराचा दौरा करणार आहेत.

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ शहरात झपाट्याने विकास होत आहे. तेथील प्रकल्प कशा पद्धतीने पूर्णत्वास नेण्यात आले याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय केले पाहिजे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरुन जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक अँड दिलीप पोकळे, कुंदन काळे, चेतन सनकत, गणेश सोनवणे, हर्षल मावळे, किशोर बाविस्कर, गजानन देशमुख, बाळासाहेब चव्हाण, अशुतोष पाटील, शेखर कोल्हे, उमेश सोनवणे आदींनी शुक्रवारी अंबरनाथचा अभ्यास दौरा केला. तेथील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रशासकी यंत्रणेने नगरसेवकांना माहिती दिली. नव्याने उभारण्यात येणारा सॅटिस प्रकल्प, प्राचीन शिव मंदिरासाठी शासनाने जो निधी मंजूर केला आहे त्या निधी अंतर्गत जी कामे होणार आहेत त्याची माहिती देखील प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी नगरसेवकांना दिली. सुनील चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम