शिरूड येथे अवतरणार दीड कोटींची पाणीपुरवठा योजना.. -आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन,अनेक विकास कामांचाही शुभारंभ

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)विधानसभा मतदारसंघातील शिरुड येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत 1.53 लक्षची पाणीपुरवठा योजना अवतरणार असून या कामाचे थाटात भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इतर विविध विकासकामांचेही भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात झाले,आमदारांचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला.आपल्या भावना व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले की विकासकामे असो किंवा शेतकरी बांधवाना शासनाच्या विविध योजनांचे वैयक्तिक लाभ असो यात अमळनेर मतदारसंघ आघाडीवर राहिला असून यापूढे देखील तो निश्चितपणे राहील हा विश्वास आहे.धार्मिक प्रवाहातील असलेल्या या शिरूड गावाने आपल्यावर नेहमीच प्रेम केले असल्याने गावासाठी आपण काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदारांनी दिली.
याप्रसंगी बाजार समितीच्या मुख्य प्रशासिका सौ.तिलोत्तमाताई पाटील, सरपंच गोविंदा सोनवणे, विकासो चेअरमन सुभाष सुकलाल पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्याम बापू पाटील, प्रफुल्ल पाटील, नरेंद्र पाटील, विनायक पाटील, कल्पेश माळी, सागर पाटील, पोलीस पाटील, पांडुरंग पाटील, विरभान पाटील, लोटन पाटील, शुभम अहिरे, लोटन पवार यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या कामाचे झाले भूमिपूजन –

यावेळी आमदार निधीतून व्यायाम शाळा बांधकाम करणे. रक्कम रु.15 लक्ष,2515 अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे रक्कम रु.15 लक्ष.आणि
डी.पी.सी. अंतर्गत- मराठी शाळेला वॉलकंपाउंड करणे रक्कम रु.30 आदी कामांचेही भूमिपूजन करण्यात आले.सदर विकास कामाबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम