अमेरिकेने दिला पंतप्रधान मोदींना पाठींबा ; चीनचा तो दावा फेटाळला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मार्च २०२३ । भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश हा आहे, असा ठराव अमेरिकी सिनेटमध्ये सादर झाला होता. त्यानुसार मॅकमोहन रेषा ही चीन व भारताच्याअरुणाचल प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.

यासंदर्भातील ठराव सिनेटर बिल हॅगेर्टी, जेफ मर्कले यांनी अमेरिकी सिनेटमध्ये मांडला होता. त्यात म्हटले होते की, हिंद-पॅसिफिक महासागराच्या परिसरात चीनच्या हालचालींमुळे काही देशांना धोका निर्माण झाला आहे. अशा प्रसंगी अमेरिकेने या देशांबरोबर, विशेषत: भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे आवश्यक आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हा मुद्दा या ठरावात ठळकपणे नमूद करण्यात आला होता. पूर्व लडाखनजीकच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या सहा वर्षांपासून चीनच्या सुरू असलेल्या आक्रमक हालचालींबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती.

अरुणाचल प्रदेश व चीनमध्ये असलेली मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे मान्य करून अमेरिकेने चीनला चपराक लगावली आहे. अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग आहे हा चीनचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला. पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचे चीनचे प्रयत्न भारताने हाणून पाडले होते. सिनेटर बिल हॅगेर्टी, जेफ मर्कले यांनी मांडलेल्या ठरावामुळे अरुणाचल प्रदेशाबाबत अमेरिकेचा दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.

चीनने भारतानजीकच्या सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली, सीमाभागात दुसऱ्या देशाच्या हद्दीत बांधकामे करण्याचा प्रयत्न केला. भूतानच्याही काही भागांवर चीनने हक्क सांगितला आहे. दुसऱ्याचा भूभाग आपला असल्याचे दाखविणारे नकाशे चीनने छापले. या सर्व गोष्टींचा अमेरिकेने धिक्कार केला आहे. तसा उल्लेख सिनेटर बिल हॅगेर्टी, जेफ मर्कले यांनी अमेरिकी सिनेटमध्ये मांडलेल्या ठरावात होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम