अमित ठाकरेंचा ताफा अडविला ; कार्यकर्त्यांनी फोडला टोलनाका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।  सध्या सर्वच नेत्यांनी राजकीय परिस्थिती बघता राज्याच्या दौऱ्यावर अनेक नेते बाहेर पडले आहे. यात मनसेचे नेते अमित ठाकरे देखील मागे नाही. त्यांनी देखील नुकताच उत्तर महाराष्ट्र दौरा करीत मुंबईत जात असतांना नाशिक जवळील एका टोल नाक्यावर त्यांचा ताफा अडविल्याने मध्यरात्री राडा झाला आहे.

काय घडली घटना ?
उत्तर महाराष्ट्राचा दौरा आटोपून मनसे नेते अमित ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असतांना नाशिक जवळील सिन्नर येथे मध्यरात्री समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धा तास ताटकळत ठेवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाकाच फोडला. अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. टोलनाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गैरवर्तनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मध्यरात्री नाशिक शहराचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम