
हभप डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मोफत नेत्ररोग, दंतरोग तपासणी शिबिर
हभप डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मोफत नेत्ररोग, दंतरोग तपासणी शिबिर
अमळनेर येथे अजिंक्यक्रांती फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजन
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर येथील कुंटे रोडवरील आस्था क्लिनिकमध्ये महंत प्रा. हभप डॉ. सुशील महाराज विटनेरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अजिंक्यक्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, दंतचिकित्सा शिबिर तसेच वृक्षारोपण आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरू तानाजी महाराज मठात मान्यवरांच्या उपस्थितीत वडाच्या वृक्षाच्या रोपणाने झाली. सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या सोहळ्याला आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री पुष्पलता भाईदास पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील, श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित भांडारकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, निमा अमळनेरचे अध्यक्ष डॉ. विशाल बडगुजर, कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर ट्रस्ट विटनेरचे अध्यक्ष दीपक पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहित पवार, सद्गुरू संत तानाजी महाराज मठाचे हभप भानुदास महाराज, नवलनगरचे स्वामी शिवानंदजी महाराज, चोपड्याचे हभप बाळासाहेब बोरसे, मंगळग्रह मंदिराचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, आस्था क्लिनिकचे डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. नीलेश शिंगाणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजिंक्यक्रांती फाउंडेशनचे संस्थापक अजिंक्य जाधव, उपाध्यक्ष गौरव पाटील, कार्याध्यक्ष विवेक जाधव, प्रदेशाध्यक्ष समाधान काळुंखे, जळगाव सोशल मीडिया जिल्हाप्रमुख तुषार धनगर, नितीन धनगर तसेच फाउंडेशनचे कार्यकारी सदस्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला परिसरातील वारकरी मंडळींसह जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम