रोटरी वेस्टच्या स्वातंत्र्य रथाने केला अमृत महोत्सवाचा जागर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे जेष्ठ रोटरी सदस्य प्रेम कोगटा यांच्या हस्ते मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर काव्यरत्नावली चौकापासून स्वातंत्र्य रथाचा रोटरी वेस्टच्या सर्व माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या रथात सलमान शहा आणि गुपच्या कलावंतांनी विविध देशभक्तीपर गीते चौकाचौकात सादर करीत अमृत महोत्सवाचा जागर केला. रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी ही गाणे सादर केले.

अयाज मोहसीन यांनी निवेदन केले. नाना पाटेकरांच्या भूमिकेत राजू यांनी संवाद म्हटले. नागरिकांनी काही ठिकाणी राष्ट्रभक्तीच्या चैतन्यात गाण्यांवर नाचत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी अध्यक्ष सुनील सुखवाणी, मानद सचिव विवेक काबरा, सहप्रांतपाल अरुण नंदर्षी, दिलीप गांधी, माजी अध्यक्ष संदीप काबरा, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, किरण राणे, अनंत भोळे, योगेश भोळे आदी मान्यवरांसह रोटरी वेस्टच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम