अमृता फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल म्हणाल्या..तिळ गुळ…
दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वेगवेळ्या कारणावरून नेहमीच सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत राहतात. “आज मैने मूड बना लिया है” हे त्यांचे पंजाबी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांनी आज मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस आज वेगळ्या अंदाजात दिसून आल्या. त्यांनी गच्चीवर जाऊन पतंगबाजी केली आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर तिळगूळ घ्या गोड गोड बोला असंही त्या म्हणतात.
“संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!” अशा शब्दांत त्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांनी मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर केलेल्या पोशाखामुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम