
AMRUT अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी सुवर्णसंधी – NIELIT औरंगाबाद केंद्रात विविध कोर्सेस उपलब्ध
AMRUT अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी सुवर्णसंधी – NIELIT औरंगाबाद केंद्रात विविध कोर्सेस उपलब्ध
जळगाव औरंगाबाद (AMRUT) – महाराष्ट्र शासनाच्या शहरी भागातील युवक-युवतींसाठी केंद्र पुरस्कृत AMRUT योजनेअंतर्गत NIELIT संस्थेमार्फत वर्ष २०२५-२६ मध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण औरंगाबाद येथील NIELIT प्रशिक्षण केंद्रात घेतले जाणार आहे.
यात ज्या खुल्या प्रवगातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकिय विभाग/ संस्था/ महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अश्या जातींना (ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार) विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या NIELIT या नामांकित प्रशिक्षण संस्थेद्वारे औद्योगिक व उत्रत कौशल्य विकासासाठी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या मार्फत निशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. याकरिता इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनी कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
*या उपक्रमांतर्गत खालील प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे:*
1. फाउंडेशन कोर्स इन इन्फर्मेशन सिक्युरिटी, 2. सायबर सिक्युरिटी असिस्टंट, 3. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, 4. सर्टिफाईड वेब डेव्हलपर, 5. सर्टिफाईड डेटा अॅनालिस्ट, 6. फाउंडेशन कोर्स इन मशीन लर्निंग युजिंग पायथन, 7. डेटा अनालिसिस विथ पायथन अॅण्ड एसक्यूएल, 8. ड्रोन अॅप्लिकेशन डेव्हलपर, 9. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) असिस्टंट, 10. फाउंडेशन कोर्स इन व्हीएलएसआय डिझाईन.
पात्रता: अर्जदाराने १२वी पास किंवा संबंधित तांत्रिक पदवी (IT/CS/Electronics/Electrical आदि) असावी. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा व लक्षित गटातील असावा. कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.
*आवश्यक कागदपत्रे:*
आधार कार्ड, जात व रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र/EWS प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
*अर्ज प्रक्रिया:*
NIELIT संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी google link देण्यात येणार आहे. त्यावर इच्छुक प्रशिक्षणार्थी यांची नाव नोंदणी केली जाईल. लवअमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन आधार संलग्न मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी व संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील योजना या टॅबमध्ये जाऊन NIELIT प्रशिक्षण योजना हे बटनावर क्लि करून अर्जाची नोंदणी करावी.
*प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक:*
प्रशिक्षण जून २०२५ पासून सुरू होणार असून, विविध कोर्सेससाठी १५ ते ९० दिवसांपर्यंतचा कालावधी असणार आहे. दररोज ६ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरी भागातील तरुणांना नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी info@mahaamrut.org.in या ईमेलवर संपर्क साधावा किंवा ७३०१९६१९६५ या क्रमांकावर कॉल करावा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम