सिनेमाची स्क्रिप्ट न वाचणारा अभिनेता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मार्च २०२३ । चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार काम करीत असतात पण चित्रपट होण्याच्या आधी प्रत्येक कलाकाराला आही सिनेमाची कथा ऐकवली जाते. त्याच्या व्यक्तिरेखेची माहिती दिली जाते. त्यानंतर कलाकार ठरवतो की त्या सिनेमात काम करायचं की नाही. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे जो त्याच्या एका ठरलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करत असताना सिनेमा रिलीज झाला तरीही स्क्रिप्ट रिडिंग करत नाही. त्या अभिनेत्याचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शक रोहीत शेट्टी यानं अभिनेता अजय देववगण त्याच्या कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट वाचत नाही.

सर्कस सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रोहीत शेट्टीनं काही किस्से समोर आणले. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत रोहीत शेट्टी म्हणाला, अजय देवगण त्याच्या कोणत्याही सिनेमाची स्क्रिप्ट वाचत नाही. त्याने फक्त सिंघमची स्क्रिप्ट वाचली होती. रोहीत शेट्टी पुढे म्हणाला, ही गोष्ट सिंघमच्या वेळीची आहे.

अजय देवगणनं सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली आणि सकाळी 7 वाजता आम्ही गोव्यात शुटींग सुरू केलं. अजय रात्री 10 वाजता लंडनहून परत आला होता. पोलिसाची भूमिका करायची आहे म्हणून त्यानं लगेच हेअर स्टाईल चेंज केली. कॉस्ट्यूम ट्रायलसाठी थोडा वेळ लागला तोवर रात्रीचे 12 वाजते होते. त्यानंतर आम्ही रनेशन सुरू केलं. रात्री 2 वाजता नरेशन पूर्ण झालं. सकाळी 7 वाजताच्या शुटसाठी रात्री 2 वाजता नरेशन केलं होतं. अजय देवगण 2022मध्ये दृश्यम 2मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.रोहीत शेट्टीनं आतापर्यंत सर्कससह 15सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या 15 सिनेमांमधील 12 सिनेमांमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. चेन्नई एक्सप्रेस, दिलवाले आणि सर्कस या सिनेमात केवळ अजय देवगण नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम