भडगांव महविद्यालयात उद्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उपस्थितीचे आवाहन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

सौ रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी नऊ वाजता पाचोरा रोड येथील रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात नोंदणी, परिचय, विदयार्थी सत्कार, मनोगत आदी विषयांवर महत्त्वाची चर्चा व विचार विनियम, आदी कार्यक्रम आयोजीत केला आहे.
कोविड मुळे सर्वांच्या गाठीभेटी कमी झाल्या सर्वांना आपण भेटता यावे यासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा दिनांक 27 रोजी आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त महाविद्यालयाची नूतन वास्तू पहाता येईल. मानवी जीवनात गत आठवणींना उजाळा देणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातच महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी म्हणजे मोरपीसच होय दिवाळीसाठी आपण सर्वजण गावी आलेला आहात महाविद्यालयाच्या प्रांगणात थोडा काळ व्यतीत करूया व गतस्मृतींना उधळा देऊया तुम्ही तर याच परंतु आपल्या मित्रांना देखील सोबत घेऊन या महाविद्यालयाच्या नवीन प्रांगणात आपले सर्वांचे स्वागत आहे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश परदेशी, उपाध्यक्ष अमोल पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एन एन गायकवाड , सचिव डॉ. प्राध्यापक दीपक मराठे, सहसचिव सुयोग नगरदेवळेकर, संचालक सुयोग जैन, स्वप्नील पाटील, नरेंद्र पाटील, अजय देशमुख, मनीषा पाटील, राजेंद्र मोरे यांनी केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम