अखेर बच्चू कडूंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । रवी राणा विरुद्ध टीका करताना बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तर राजापेठ पोलिसांनी विरुद्ध बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी 501 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

रवी राणा यांनी १ नोव्हेंबर आत पुरावे सादर करावे. अन्यथा हिजडा घोषित करेल अशी भाषा वापरली आहे. त्यामुळे महिला अमरावतीत आक्रमक झाल्यात. महिलांविषयी अपशब्द वापरणे योग्य नसल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम